सावली तालुक्यात वाघाचा हल्ला ; शेतकरी ठार, परिसरात भीतीचे वातावरण

134

सावली तालुक्यात वाघाचा हल्ला ; शेतकरी ठार, परिसरात भीतीचे वातावरण

लोकवृत्त न्यूज
सावली, दि. ४ :- सावली तालुक्यातील पाथरी उपवन परिक्षेत्रात आज सकाळी भीषण घटना घडली. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या पांडुरंग भिका चचाने (वय ६२, रा. पाथरी) यांच्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. गवत कापत असताना वाघाने त्यांना पकडले आणि जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत ओढत नेले. या हल्ल्यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटना कक्ष क्र. १६६२ मधील असून माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक तरसे, वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, क्षेत्रसहायक पाटील यांच्यासह वनविभागाचा पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना तातडीने ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात कॅमेरे बसविण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
दरम्यान, या परिसरात पिलांसह वाघीण फिरत असल्याची नोंद असल्याने शेतकरी व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

#सावली #पाथरी #वाघाचाहल्ला #शेतकरीठार #वनविभाग #चंद्रपूर #विदर्भ #मानववनसंघर्ष #मराठीबातमी #लोकवृत्त
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Chandrapurnews #Maharashtra