गडचिरोली – आरमोरी मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त ;

50

खड्डेमुक्तीच्या घोषणांना फाटा – प्रशासन अपघाताची वाट पाहतेय का?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- “जिल्हा खड्डेमुक्त करू” अशा गाजावाजातल्या घोषणांचा फोलपणा आता आरमोरी मार्गावर उघड होत आहे. गडचिरोली-आरमोरी या महत्त्वाच्या मार्गावर ठिकठिकाणी खोल खड्डे पडले असून नागरिक आणि वाहनधारक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. प्रशासन मात्र फक्त बैठकीत आदेश देण्यात आणि आश्वासनांच्या गजरात गुंग आहे.
जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आणि दिरंगाई करणाऱ्या यंत्रणांवर कारवाईचा इशारा दिला. परंतु प्रत्यक्षात आरमोरी मार्गावर अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रश्न आहे की – “रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादा अपघात होऊन जीव गमावल्याशिवाय दुरुस्ती होणार का?”
सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांसारख्या यंत्रणा एकमेकांवर जबाबदारी ढकलत बसतात, तोवर प्रवाशांच्या डोक्यावर अपघाताचे सावट कायम आहे. खड्डेमुक्तीची घोषणा फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर मृत्यूचे खड्डे उघडे तोंड करून उभे आहेत.
दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर अपघात झाल्यास त्याची थेट जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews #gadchirolipolice #RoadSafety #Accident #Gadchiroli #ArmoriRoad #Potholes #PublicWorks #Administration #Maharashtra #गडचिरोली #आरमोरीमार्ग #खड्डे #अपघात #खड्डेमुक्ती #जिल्हाधिकारी #सार्वजनिकबांधकाम #महाराष्ट्र