लोकवृत्त न्यूज
ब्रह्मपुरी, दि. 13 :- ब्रह्मपुरी शहरातील घरफोडी आरोपीच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळत जेरबंद केले आहे. आरोपीकडून 63,000/- रुपयांचा सोन्याचे दागिने व मोबाईल हस्तगत करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, 12 ऑक्टोबरच्या रात्री पेठ वार्ड परिसरात एकाच आरोपीने दोन घरांमध्ये घरफोडी केली. धनीराम नकटूची मेश्राम यांच्या घराचे दरवाजे तोडून 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (23,000/- रुपये) व नोकिया मोबाईल (1,000/- रुपये) चोरले. दुसऱ्या घटनेत, सोहेल नूरखान पठाण यांच्या घरातून Realme GT8 (30,000/- रुपये) व IQOO मोबाईल (10,000/- रुपये) चोरले गेले.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने शोधकार्य चालवले. या दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरातून 22 वर्षीय श्रीकांत उर्फ ‘बोटतुट्या’ राजू जुनारकर, रा. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. आरोपीकडून चोरी केलेले सर्व मोबाईल व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
सदर आरोपीस संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास पोहवा मुकेश गजबे व पोहवा अजय कटाईत करत आहेत.










