लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांना कारगिल चौकात मेणबत्ती लावून श्रद्धांजली

261

 दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने कार्यक्रम

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १२ : लाल किल्ला बॉम्बस्फोटातील हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, गडचिरोली यांच्या वतीने मेणबत्ती प्रज्वलित करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मंडळाचे अध्यक्ष उदय धकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी उपस्थितांनी देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांना मेणबत्ती लावून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमास मंडळाचे उपाध्यक्ष रेवनात गोवर्धन, प्रकाश भांडेकर, सुनील देशमुख, सुरेश लोणारे, प्रफुल आंबोरकर, सुचिता कामडी, अश्विनी खोब्रागडे, पुरुषोत्तम शेंडे, निलेश सातपुते, राजू पुंडलिककर, शीतल आंबोरकर, देवानंद कामडी, महेंद्र वाघमारे, राजू साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकमुखाने “भारत माता की जय”, “वंदे मातरम” अशा घोषणांनी परिसर दुमदुमवला.
कार्यक्रमाचे संचालन सुरेश लोणारे यांनी केले.
देशभक्तीचा उत्साह आणि हुतात्म्यांप्रती कृतज्ञतेचा भाव या कार्यक्रमातून व्यक्त झाला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळाकडून दरवर्षी राष्ट्रीय घटनांच्या स्मरणार्थ अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.