तरुण नेतृत्वाचा नवा चेहरा : सौ. कोमल नैताम यांनी प्रभाग ०२ मध्ये उभी केली आशेची किरणे
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०२ मध्ये तरुणाईचा आत्मविश्वास आणि विकासाचा दृढ संकल्प घेऊन सौ. कोमल छत्रपती नैताम मैदानात उतरल्यानंतर परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरून उमेदवारी जाहीर करताच त्यांच्या नेतृत्वगुणांची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे.
लांझेडा वार्डातील अनुभवी आणि कर्तृत्ववान कार्यकर्ते रवींद्र बेंडूजी भांडेकर यांच्या कन्या असलेल्या सौ. नैताम यांनी बालपणापासून समाजकार्यातून मूल्ये आत्मसात केली असून प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्नांची ग्वाही दिली आहे.
प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी सातत्याने संपर्क, प्रामाणिक सेवा आणि समस्यांचे तातडीने निवारण हेच माझे ध्येय आहे, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी मतदारांना मनापासून आवाहन केले.
रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सुरक्षा, युवकांसाठी संधी निर्माण करणे आणि प्रभागाला विकसित सुविधा देण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केले आहे. कमळ चिन्हासमोरील आपले मौल्यवान मत मला दिल्यास प्रभागाला नवी दिशा देण्याचे काम निश्चयाने करीन, असे त्या म्हणाल्या.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग ०२ मध्ये सौ. नैताम यांच्या सभ्य, सौम्य आणि लोकाभिमुख नेतृत्वाची चर्चा वेगाने पसरत असून नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण दिसून येत आहे. तरुण नेतृत्वाचा हा नवा चेहरा प्रभागाच्या विकासासाठी ‘आशेची किरण’ बनत असल्याचे मतदारांमध्ये उमटत आहे.










