अमृताताई फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती गडचिरोलीत आदिवासी संस्कृतीचा भव्य महोत्सव!

449

‘गडचिरोली ट्रायबल कल्चरल कॉम्पिटिशन – कोया किंग अँड क्विन’चे तिसरे पर्व 28 व 29 जानेवारीला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली: गडचिरोली येथे हिरा सुखा बहुउद्देशीय आदिवासी संस्था व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गडचिरोली ट्रायबल कल्चरल कॉम्पिटिशन – कोया किंग अँड क्विन’ (वर्ष तिसरे) या भव्य आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय कार्यक्रम दिनांक 28 व 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता, महाराज हॉल, धानोरा रोड, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

या महोत्सवासाठी अमृताताई फडणवीस, संचालिका – दव्यॉज फाउंडेशन, मुंबई या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सांस्कृतिक महोत्सवात,एकल आदिवासी गीत गायन स्पर्धा,ग्रुप आदिवासी नृत्य स्पर्धा,आदिवासी संस्कृतीवर आधारित साहित्य व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा,तसेच विशेष आकर्षण म्हणून ‘कोया किंग अँड क्विन’ स्पर्धा
अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व स्पर्धा पूर्णतः मोफत असून, आदिवासी कलाकार व युवक-युवतींना आपली कला, परंपरा व संस्कृती सादर करण्यासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरातील इंदिरा गांधी चौकातील विश्राम गृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. आयोजित गामा पञकार परिषदला यावेळी
डॉ. प्रणय खूणे, डॉ. भारत खंडी, राहुल भाऊ झाडे , रमेश अधिकारी, भुषण खेडेकर, जाहिदा शेख, मनिषा मडावी, राणी गोपसेटवार, स्नेहा मेश्राम
यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महोत्सवात विविध राज्यांतून आदिवासी स्पर्धक व कलाकार सहभागी होणार असून, हा कार्यक्रम उदयोन्मुख आदिवासी संस्कृतीचा राज्यस्तरीय मिलन महोत्सव ठरणार आहे. गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने या जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन होणे विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

आदिवासी संस्कृती जपण्याचा निर्धार

“आदिवासी संस्कृती टिकून राहिली पाहिजे” या उद्देशाने सर्व आदिवासी बांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आदिवासी नृत्य, संस्कृती व कलागुणांना विकासाची दिशा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

स्टॉल, कला व रोजगाराची संधी

कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल,आदिवासी हस्तकला व पारंपरिक साहित्य विक्रीचे स्टॉल,स्वतः तयार केलेल्या आदिवासी साहित्याच्या विक्रीसाठी मोफत स्टॉल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे आदिवासी कलाकार, महिला व विद्यार्थ्यांना आर्थिक संधी मिळणार आहे.

📞 मोफत स्टॉल बुकिंगसाठी नोंदणी संपर्क क्रमांक : 9405207739   9423598614

उत्कृष्ट पारितोषिकांचे आकर्षण

या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी उत्कृष्ट व आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली असून, विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

एकूणच ‘गडचिरोली ट्रायबल कल्चरल कॉम्पिटिशन – कोया किंग अँड क्विन’ हा कार्यक्रम म्हणजे आदिवासी कला, परंपरा, संस्कृती, अस्मिता आणि एकतेचा भव्य उत्सव ठरणार असून, सर्व आदिवासी समाजासाठी हा एक अभिमानाचा क्षण ठरणार आहे.