भरधाव लोहखनिज ट्रकची स्कार्पिओला भीषण धडक ; ट्रकच्या वेगावर लगाम लावणार तरी कोण?

746

_ स्कार्पिओ वाहन मालकाचे लाखोंचे नुकसान

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. २५ :- शहरातील चामोर्शी मार्गावर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने पुन्हा एकदा अपघात घडला. रविवारी २५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी झालेल्या या धडकेत स्कार्पिओचे लाखोंचे नुकसान झाले आहे, तर मागे चालत असलेल्या बसलाही धडक लागल्याने नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली.
प्राप्त माहितीनुसार चामोर्शी मार्गावर एमएच ४० एन ९३८१ क्रमांकाची बस पुढे जात असताना एमएच ३३ वाय ४९२९ क्रमांकाची स्कार्पिओ तिच्या मागे चालत होती. याचवेळी सीजी ०७ सीएस ०८७५ क्रमांकाच्या भरधाव लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने स्कार्पिओला जोरदार धडक दिली.

शहरातून धावणाऱ्या ट्रकांचा वेग – अपघाताला आमंत्रण

गडचिरोली शहरातून दररोज शेकडो अवजड ट्रक, विशेषतः लोहखनिज वाहतूक करणारे, मार्गक्रमण करतात. मात्र शहरातील भरधाव वेगामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. नागरिकांचे संतापाचे स्वर जिल्हाभरात ऐकू येत आहेत, तर अपघातामुळे “ट्रकच्या वेगावर लगाम कोण लावणार?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लहान वाहनांवर कारवाई, तर ट्रक मोकाट?

नागरिकांची नाराजी वाढत आहे की शहरात लहान वाहनांवर नियमबाहुलीवर कारवाई होत असली तरी भरधाव लोहखनिज ट्रकवर कारवाई होत नसल्याने चालक निडर झाले आहेत. शहरात चर्चा आहे की, ‘आमचा पाठीराखा आहे, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही’, अशा मनस्थितीतून हे ट्रक धावत आहेत.
एकूणच, शहरातून भरधाव ट्रकांची वाहतूक नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे, आणि प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

#gadchirolinews #accident