कारल्याची भाजी वरून वाद ; आईची केली हत्या

544

कारल्याची भाजी वरून वाद ; आईची केली हत्या

लोकवृत्त न्यूज
मुल दि.२० : कारल्याची भाजी का बनवली या क्षुल्लक कारणावरून पोटच्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. सुमित्रा पेटकुले वय, 65 वर्ष असे मृतक आईचे नाव आहे. तर जगदीश दशरथ पेटकुले वय, 35 असे आरोपी मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री त्याच्या आईने कारल्याची भाजी केली होती. ही भाजी का केली म्हणून रागाच्या भरात जगदीशने आई सुमित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दारूचे व्यसन आणि घरात मारहाण करणे यामुळेच जगदीशची पत्नी दोन महिन्यांपूर्वीच त्याला सोडून मुलांना घेऊन निघून गेली. त्यामुळे जगदीश हा आईसोबत राहत होता.
गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी जगदीश घरी आला तेव्हा आईने कारल्याची भाजी बनवली होती. कारले का बनविले म्हणून तो आईशी वाद घालू लागला आणि तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत आईचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या घटनेची माहिती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपी जगदीश पेटकुलेला अटक केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.