चैतन्यमयी वातावरणात विद्यानगरात महिला दिन संपन्न; संघटनशक्तीचे दर्शन…
लोकवृत्त न्यूज
ता/प्र.धानोरा :- शहरातील विद्यानगर प्रभाग क्रमांक १ च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी परचाके ताई, चौधरी ताई आणि कुंडू ताई यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित महिलांना आपापसातील स्नेह वृद्धिंगत करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या महिलांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत नियोजनबद्ध आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उपक्रमाने स्त्रीशक्तीचा जागर खऱ्या अर्थाने यशस्वी केला. केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर प्रभागातील महिलांच्या संघटनशक्तीचे दर्शन घडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
नियोजनाचा आदर्श सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील सक्रिय महिला कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला. यामध्ये सौ. संगीताताई वाघाडे, शोभाताई पुसतोडे, चतारे मॅडम, वैशालीताई धाईत, वर्षा भोंडे, वर्षा मने, विभाताई सहारे, सोमनकर ताई, मीनाताई गडपाडे, पौर्णिमाताई टिकले, राजगडे ताई, राकडे ताई, गावळे ताई, सहारे ताई आणि योगिताताई गडपायले यांचा प्रामुख्याने समावेश होता. या सर्व महिलांच्या समन्वयातून आणि मेहनतीमुळे कार्यक्रमात एक आगळीवेगळी शिस्त आणि उत्साह दिसून आला. समस्त विद्यानगरातील महिलांच्या या एकजुटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“केवळ चूल आणि मूल यापुरते मर्यादित न राहता महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घ्यावी आणि आपल्या हक्कासाठी जागरूक राहावे, असा संदेश यावेळी उपस्थित महिलांना देण्यात आला.”











