एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

1821

• अकरावीतील १७ वर्षीय प्रिन्स मेश्राम मृत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहराजवळील एकलव्य आश्रम शाळेच्या वसतिगृहात अकरावीतील १७ वर्षीय प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चामोर्शी तालुक्यातील शांतिनगर येथील रहिवासी असलेला प्रिन्स हा शाळेच्या हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे ६.२० वाजण्याच्या सुमारास तो वसतिगृहात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सहविद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात येताच त्याला तातडीने सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. प्रिन्स हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.