सेलू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

229

लोकवृत्त न्यूज
जिंतूर (परभणी) १६ एप्रिल:- नूतन महाविद्यालय विद्यार्थी समिती व आम्ही सेलूकर यांच्या वतिने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त शहरातील नगरपालिका पूतळा परिसर येथे आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने क्रेनच्या साह्याने छ.शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भव्य पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नूतन महाविद्यालय विद्यार्थी समिती व आम्ही सेलूकर यांच्या वतिने नूतन महाविद्यालय येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र शिंदे ,डॉ.संजय रोडगे, डॉ आशिष डख,डॉ.ऋतुराज साडेगावकर, कृषी उत्पन्न बाजार मा. समितीचे दिनकर वाघ , जि.प.मा. सभापती अशोक काकडे,ऑड दतराव कदम, ऑड.विष्णू ढोले, रूपाली ठाकूर, निर्मला लिपणे, गटकळ करिअर अकॅडमी चे संचालक रामेश्वर गटकळ, जयसिंग शेळके,कपिल फुलारी, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, शिवाजी आकात, अशोक उफाडे,रघुनाथ बागल,अर्जुन बोरुळ, अर्जुन बावीसे,विठ्ठल कोकर,राहुल जाधव,गोटू धापसे व विद्यार्थी समितीच्या वतिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. ढोलताशाच्या तालावर तरुणाई थिरकत होती, या मिरवणुकीत महिला मुलींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सर्वोदय नगर येथे मिरवणुकीतील भव्य प्रतिमांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत ७० मूलींचे लेझीम पथक, ४० विद्यार्थीनीचे ध्वजपथक, ढोल ताशा पथक, ट्रॅक्टर मध्ये भारताचे संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार भगवान बुद्ध,डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, तसेच महापुरुषांचे सजिव देखावे तयार करण्यात आले होते. मिरवणुकीच्या वेळी तहसीलदार दिनेश झांपले, नायब तहसीलदार प्रशांत थारकर,पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड, बालू झमखडे, कृष्णा काटे,नरसिंग हरणे उपस्थित होते.शहरातील प्रमूख मार्गावरून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयाचे आजी माजी विद्यार्थी आदित्य अंभोरे, निखिल पहाडे, अनिकेत पांडागळे, रितेश आठवे, कृष्णा रोडगे ,संभाजी रोडगे ,अनिरुद्ध मगर, हितेश पारपियानी,निलेश धापसे,वरद काकडे, श्रीकांत झुटे ,नाथा खांडेकर, आदींनी परिश्रम घेऊन मिरवणूक यशस्वी केली मोठ्या संख्येने ,विद्यार्थी व समाज बांधव यांची उपस्थिती होती.