कुरुड गावातील निर्घून हत्येचा पर्दाफाश, आरोपीस जेरबंद

0
467

 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ८ मार्च:- डोक्यावर मारुन त्यास गंभीर जखमी केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यानुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे मर्ग, अन्वये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. सदर अकस्मात मृत्युमध्ये अधिक तपास करुन मय्यत नाव प्रतिभ ऊर्फ पांड्या विजय घोडेस्वार याचे डोक्यावर मारुन त्यास जिवानिशी ठार मारणा­या अज्ञात आरोपीविरुध्द पोलीस उपनिरीक्षक संजय गोंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन देसाईगंज येथे अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीने कोणत्याही स्वरुपाचा पुरावा अथवा दुवा मागे सोडलेला नसल्याने सदर गुन्ह्रातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून त्यास अटक करणे हे गडचिरोली पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

एक तपास पथक नियुक्त केले. त्याप्रमाणे तपास पथकाने मौजा कुरुड गावातील लोकांकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली असता, साक्षीदारांचे बयाणावरुन व पोलीस उपनिरीक्षक धनगर, पोअं/ढोके यांनी मिळविलेल्या गोपनिय बातमीदारांच्या माहितीवरुन संशयीत इसम नामे विकास जनार्दन बोरकर वय 50 वर्षे, धंदा-मजुरी रा. कुरुड तह. देसाईगंज, जि. गडचिरोली याची गुन्ह्राच्या अनुषंगाने अधिक विचारपूस करुन तपास केला असता, त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास सदर गुन्ह्रामध्ये दिनांक 06/03/2024 रोज सायंकाळी 17:09 वा. अटक करण्यात आली.

अधिक तपासात असे दिसून आले की, मय्यत हा आरोपीची पत्नी व मुलगी यांचेकडे वाईट नजरेने बघायचा व त्यांना वाईट वाईट कमेंट करायचा व त्यांचे घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करायचा. त्यामुळे मय्यत व आरोपी यांच्यात नेहमी झगडा भांडण होत होते. दिनांक 08/02/2024 रोजी रात्रो 10:00 ते 10:30 वा. चे दरम्यान मय्यताने आरोपीस अश्लील भाषेत वाईट वाईट शिवीगाळ केल्याने आरोपीने मय्यताचे डोक्यात सिमेंटच्या कवेलुने मारुन गंभीर जखमी करुन खून केल्याची माहिती समोर आली.

सदर गुन्ह्रात कोणतेही पुरावे नसताना केवळ गोपनीय माहितीच्या आधारावर आणि साक्षिदारांचे बयाणावरुन आरोपीस निष्पन्न करुन त्यास अटक करुन अत्यंत गंभीर व क्लिष्ट स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले. आरोपीला मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट देसाईगंज यांचे समक्ष रिमांडकामी हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दिनांक 07/03/2024 ते दिनांक 11/03/2024 रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धनगर हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here