Home Breaking News चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन

544

दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर ३० मे :- चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर MP Balu Dhanorkar यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता वरोरा येथील निवासस्थानी आणण्यात येणार आहे, आज 30 मे रोजी दुपारी 2 वाजेपासून 31 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर 31 मे रोजी वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.

लोकवृत्त न्यूज तर्फे बाळूभाऊंना धानोरकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली🙏🙏

Don`t copy text!