Home Breaking News भरधाव अज्ञात ट्रक च्या धडकेत तीन म्हशी ठार तर एक गंभीर

भरधाव अज्ञात ट्रक च्या धडकेत तीन म्हशी ठार तर एक गंभीर

599

– दुचाकीस्वार बालबाल बचावला

लोकवृत्त न्यूज
सावली, १२ जून : तालुक्यातील व्याहाड-गडचिरोली मार्गावर असलेल्या मोखाळा येथे अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत तीन म्हशी जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना 12 जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
मूल मार्गे गडचिरोली जात असलेल्या भरधाव ट्रक ने मोखाळा येथे मुख्य मार्गावर म्हशी ला धडक दिली यात तीन म्हशी जागीच ठार झाले तर एक म्हस गंभीर जखमी झाली. या अपघातात दुचाकी चालक हा बालबाल बचावल्याची माहिती असून ट्रक चालक हा ट्रक घेऊन घटनस्थळावरून पसार झाला.
या अपघातात म्हस मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Don`t copy text!