पैसे डबल होण्याचे आमिष दाखवून केली आर्थीक फसवणुक

635

पैसे डबल होण्याचे आमिष दाखवून केली आर्थीक फसवणुक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.३० :- शहरातील इसमाची पैसे डबल होण्याचे आमिष दाखवून लाखो रूपयांची आर्थीक फसवणूक केल्याची घटना गडचिरोलीची शहरात २९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी फसवणूक झलेल्या इसमाने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपी सतीश लहुजी येरगुडे रा. तुकुम वार्ड चंद्रपूर ता.जि.चंद्रपूर याविरूध्द गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला आहे.
गडचिरोली येथील डोमाजी डेकलुजी डोंगरे यांच्याशी आरोपी सतीश येरगुडे याने मुदतीठेव म्हणुन ठेवण्याच्या मोबदल्यात 3 लाख चे 6 लाख रूपये मिळतील व आरडी चे 21 हप्ते 2000 रूपये प्रमाण 42 हजार रूपये अशी एकुण 3 लाख 42 हजार रूपये व मुदतीठेवीच्या व्याजासह 6 लाख 42 हजार रूपये इतक्या रकमेची आर्थिक आमिष दाखवून फसवणूक केली. सदर प्रकार 31 ऑक्टोबर ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत घडला असून आपली फसवणूक झाल्याचे डोमाजी डोंगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी गडचिरोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पोलीसांनी तपासात घेतला आहे.
सदर प्रकाराने खळबळ उडाली असुन आणखी किती लोकांसोबत अशाप्रकारे घडले आहे शोधणे गडचिरोली पोलीसांपूढे मोठे आव्हान अभे आहे.