Home गडचिरोली गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या

गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या

853

गळफास घेऊन विवाहित इसमाची आत्महत्या

लोकवृत्त न्यूज
धानोरा दि.२२ :- घराच्या अंगणात असलेल्या उंबराच्या झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २२ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास धानोरा येथे उघडकीस आली. आनंद इतवारी वटी ( वय ३०) असे गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे.
मृतक आनंद हा मुळचा कोरची तालुक्यातील वाको येथील आहे. लग्नानंतर तो आपल्या सासुरवाडीला धानोरा येथे राहत होता. धानोरा येथे तो पत्नी व दोन मुलासह मोलमजुरी करून राहत होता. दरम्यान त्याला दारूचे व्यसन जडले होते. आज २२ सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास त्याने अंगणातील झाडाला दोराने गळफास घेतला. सकाळी त्याची पत्नी झोपून उठल्यानंतर तिला तो गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. घटनेची माहिती धानोरा पोलीस स्टेशनला देण्यात आली असता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवाविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले. दरम्यान आनंद चे आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहे.

 

Don`t copy text!