Home Breaking News वैनगंगा नदीमध्ये नाव पलटली : महिलेस जलसमाधी

वैनगंगा नदीमध्ये नाव पलटली : महिलेस जलसमाधी

647

– चारजण बचावले

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.२८ : तालुक्यातील वाघोली येथील वैनगंगा नदी घाटावरून नदीपात्रातून नावेने पाच जण नदीपलीकडील कोरंबी येथे जात असताना नदीपात्राच्या मध्यभागी जाताच नाव पलटून मोठी दुर्घटना शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेत एका महिलेस जलसमाधी मिळाली तर चारजण बालबाल बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी वाघोली येथील नदी घाटावर वाघोली वरून कोरंबी येथे डोंग्याने नावाड्यासह तीन षुरुष व दोन महिला जात असतांना नदीच्या मध्यभागी गेल्यावर नाव नदीत पलटली. यावेळी नावेमधे असलेले पाचही जण नदीपात्रात बुडाले, दरम्यान यातील चार जण पाण्यातून कसेबसे बाहेर निघाले तर श्रीमती. गिता नरेंद्र चुधरी (वय २६ ) रा.नवेगाव भु ता.मुल जि.चंद्रपूर ह्या पाण्यात बुडाल्या असून अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही अशी माहिती आहे. घटनेनंतर मोक्यावर महसुल प्रशासन व पोलिस यांचे मदतीने शोध मोहीम उशिरापर्यंत सुरु होती.

Don`t copy text!