गडचिरोली : अखेर त्या वाघिणीला वनविभागाने केले जेरबंद

0
1413

– कृषी विज्ञान केंद्रात सकाळी आढळली होती वाघीण


लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २० मार्च : शहरातील चंद्रपूर या मुख्य मार्गावर असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात शिरलेल्या वाघिणीस गडचिरोली वनविभागाने रेस्क्यू टीम च्या साहाय्याने जेरबंद केले असून गडचिरोली वासीयांनी सुटकेचा स्वास सोडला आहे.
शहराच्या मध्यभागी असलेल्या आयटीआय चौकात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात आज २० मार्च रोजी वाघ आढळून आल्याची माहिती शहरभर पसरली. सदर माहिती वनविभागाला देण्यात आली असता चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम पाचारण करण्यात आले होते. दरम्यान अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू टीम ने मोहीम राबवत अखेर वाघिणीला जेरबंद करण्यात आले आहे.
वाघिण आढळल्याने शहरवासीयांनी बघण्याकरिता एकचं गर्दी केली होती. मात्र आता वाघिणीला जेरबंद केल्याने सुटकेचा स्वास घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here