गडचिरोलीत मुख्य चौक अंधारात, नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- शहराच्या मध्यवर्ती असलेल्या इंदिरा गांधी चौकात मागील चार-पाच दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. नागरिक व वाहनचालकांना याचा मोठा फटका बसत असून, नगरपालिकेच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या या चौकात नागरिकांची मोठी ये-जा असते. फुटपाथवर विक्रेते व्यवसाय करत असतात आणि ग्राहकांची गर्दीही कायम असते. मात्र, रात्रीच्या वेळी दिवे बंद असल्याने वाहनधारकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे.
नगरपालिका कर वसुलीमध्ये व्यस्त असल्याचे दिसत असताना, नागरिकांच्या सुरक्षेकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करत आहे. पथदिवे बंद असल्याने कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #नगर परिषद गडचिरोली)











