एटापल्ली महिला सांस्कृतिक कला महोत्सव व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

489

लोकवृत्त न्यूज
एटापल्ली, ता. ४ एप्रिल : – एटापल्ली येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणावर “एटापल्ली महिला सांस्कृतिक कला महोत्सव तथा सत्कार सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम “सावित्रीच्या लेकी समूह, एटापल्ली” यांच्या सौजन्याने सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन नयन गोयल, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान डॉ. सोनलताई कोवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली यांनी भूषवले. यावेळी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आपल्या भाषणात डॉ. कोवे यांनी महिलांनी आपल्या कौशल्याने आणि कर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण केला असून, इतर महिलांना सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या उपाध्यक्ष म्हणून कुमारी तनुश्री धर्मराव बाबा आत्राम (सिनेट सदस्य व राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष गडचिरोली), सारिका गडपल्लीवार (अहेरी विधानसभा कार्याध्यक्ष), रुपाली दुधबावरे (राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष, चामोर्शी) आणि अर्चना निमसरकार (उद्योजिका, आष्टी) यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून चैतन्य कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी), हेमंत गांगुर्डे (तहसीलदार), आदिनाथ आंधळे (गटविकास अधिकारी), प्रणय तांबे (मुख्याधिकारी, नगर परिषद) आणि ठाकूर नीलकंठ कुकडे (पोलीस निरीक्षक, एटापल्ली) उपस्थित होते.

कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरणांसोबत महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यामुळे एटापल्ली परिसरात महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले गेले असल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली.