राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा

0
66

जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचं काटकर म्हणाले.

लोकवृत्त न्यूज
मुंबई, २० मार्च:- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे.जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे.तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना सांगितलं. उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन काटकर यांनी केलं आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या शिष्टमंडळामध्ये १६ सदस्य होते. मागील काही वेळापासून संपकरी आणि सरकारसोबत चर्चा सुरु होती. ही चर्चा यशस्वी झाल्याची माहिती आहे. सरकार संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं काटकर यांनी सांगितलं. जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं सरकारने आश्वासन दिल्याचं काटकर म्हणाले.

 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here