Home Breaking News सई ताम्हणकर १८ नोव्हेंबरला गडचिरोलीत

सई ताम्हणकर १८ नोव्हेंबरला गडचिरोलीत

911

– भाजप उमेदवार मिलिंद नरोटे यांच्या प्रचार रॅलीत राहणार उपस्थित

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,:- भाजपाच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी डॉ. मिलिंद नरोटे यांना उमेदवारी मिळाल्याने प्रचार मोठ्या जोमात सुरू आहे अशातच स्टार प्रचारकांची मांदियाळी सुद्धा दिसून येत आहे. नरोटे हे डोक्याला बाशिंग बांधून आपल्या क्षेत्रात जोमाने प्रचार दौरे, गृहभेटी करीत आहेत. येत्या १८ नोव्हेंबर रोजी सिनेअभिनेत्री सई ताम्हणकर यांना नरोटे यांनी आमंत्रित केले असून त्या चामॉर्शी व गडचिरोली येथे प्रचार रॅली मध्ये सहभागी होणार आहेत. करिता मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!