– स्पंदन फाउंडेशनचा पुढाकार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ०२ : तालुक्यातील पुलखल येथे स्पंदन फाउंडेशनचा मदतीने युवा गर्जना सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. या वाचनालयाचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते नुकतेच १ डिसेंबर रोजी करण्यात आले.
नवनवीन रोजगार भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशातच पुलखल येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वाचनालयाची आवश्यकता होती. स्पंदन फाउंडेशन ही विविध उपक्रम राबवित असतात त्याचा अनुषंगाने स्पंदन फाउंडेशनच्या पुढाकाराने पुलखल येथे युवा गर्जना सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुलखल वसियांनी आमदार डॉ. नरोटे यांचा सत्कार करीत अभिनंदनाचा वर्षाव केला. आमदार डॉ. नरोटे यांनीही गावातील समस्यांबाबत विचारणा करून काहीही समस्या जाणवल्यास त्या लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यापर्यंत पोहचवण्यात याव्यात अशी साद घातली.










