– शिवजन्मोत्सव सोहळा २०२५ मध्ये गुंजणार ‘भगवा रंग’
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १७ : जय छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप नेहरू वार्ड गडचिरोली द्वारा १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भगवा रंग भजन गायिका शहनाज अख्तर यांचा भव्य जागरण सोहळा आयोजित करण्यात आला असून गडचिरोली शहरात ‘भगवा रंग’ गुंजणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली शहरातील नेहरू वार्ड क्रमांक मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे, भगवा रंग प्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा भव्य जागरण सोहळा आयोजित केला असून शहनाज अख्तर ह्या गडचिरोली शहरात पहिल्यांदाच येत आहे. शहनाज अख्तर यांचे विविध भजन आजही नागरिकांच्या कानी पडत असतात, छुम छुम छनन बाजे मईया पाव पैजनीया हे त्यांचे प्रसिद्ध असे अल्बम आजही गुंजताना दिसत असून ‘भगवा रंग’ हे भजन शुद्ध अनेकांचे मुखी आजही गुणगुणतांन दिसून येते. आता मात्र शहनाज अख्तर ह्या येत्या १९ फेब्रुवारी रोजी गडचिरोली शहरात येत असून त्यांच्या विविध भजनांचा आस्वाद गडचिरोलीकरांना घेता येणार आहे. शहनाज अख्तर यांच्या भजनाचे चाहते गडचिरोली शहरात मोठ्या प्रमाणात असून या भव्य जागरण सोहळ्याला गडचिरोलीकरांची मांदियाळी पहावयास मिळणार आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Shahnaz Akhtar #भगवा रंग #शहनाज अख्तर )













