मुरुमगाव : अवैधरित्या रेती तस्करी करणारे जेसीबी व ट्रॅक्टर केली जप्त

359

– धानोरा महसूल विभागाची कारवाई
लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. ०३ : तालुक्यातील मुरूमगाव येथे अवैधरित्या रेती तस्करी करणारे जेसीबी व ट्रॅक्टर केली जप्त केल्याची कारवाई धानोरा महसूल विभागाने रात्रोच्या सुमारास केली. सदर जप्त करण्यात आलेले जेसीबी सागर हरिराम कवाडकर रा. मुरूमगाव यांच्या मालकीची तर ट्रॅक्टर मालक रुपेश सोमसिंग हिडको रा.रामपूर असल्याची माहिती पथकाने दिली आहे. जेसीबीवर साडेसात लाख ७,५०,०००/- तर ट्रॅक्टरवर एक लाख अठरा हजार सहासे रुपये १,१८,६००/- रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती आहे. सदर कारवाईने अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून जप्त गाडी वर नंबरच नाही असे दिसून येत आहे.
धानोरा येथील महसूल विभागाला रामपुर रोड वरील नाल्यातून अवैधरित्या जेसीबीने रेती उपसा करून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच महसूल विभागाचे पथक घटनास्थळी पोहचुन नाल्यातून अवैध रेती जेसीबी उपसा करणारी जेसीबी आणि वाहतूक करणारी ट्रॅक्टर लगेच जप्त करून धानोरा येथील तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले. सदर दोन्ही गाड्या वर नंबर प्लेट दिसुन येत नाही.
सदर कारवाई तहसीलदार अविनाश शेंबटवाड, नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, दिलीप डोंगरे तलाठी (दुधमाळा) वाहन चालक आशिष पोरेडीवार व महसूल सेवक आशिष पोरेटी यांच्या पथकाने कारवाई केली.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #crime #रेती )