मैथिली खोबेचा दैदिप्यमान यशप्रकाश : १०वीत ९६% गुण मिळवून घवघवीत यश
लोकवृत्त न्यूज
ग्रेटर नोएडाच्या राम-इस इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थिनी मैथिली खोबे हिने सीबीएसई इयत्ता १०वीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या घवघवीत यशामुळे तिने आपल्या पालकांचे, शिक्षकांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
मैथिलीने आपल्या यशाचे श्रेय शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाला दिले असून, तिच्या आई रूपाली भांडेकर आणि वडील ललित खोबे यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाले असल्याचे ती सांगते. तिच्या कठोर अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तिने हे यश मिळवले आहे.
‘जर्नी ऑफ सक्सेस’ परिवाराकडून मैथिलीला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. मैथिलीसारख्या विद्यार्थिनींमुळे नव्या पिढीला प्रेरणा मिळत असून, ती भविष्यातही असेच यश मिळवत राहो, हीच सर्वांची अपेक्षा आहे.


