गडचिरोली-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प

447

– मोहझरीजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १६ जून :- गडचिरोली-आरमोरी मुख्य मार्गावर मोहझरी परिसरात आज सायंकाळी अचानक झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड थेट रस्त्यावर आडवे पडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा अडकलेल्या प्रवाशांना उभं राहावं लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी मार्गदर्शन करत वाहने सुरक्षितपणे बाजूला लावण्याचे आवाहन केले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसून, काही तासांत मार्ग मोकळा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.