– गडचिरोलीत ABVP च्या जिल्हास्तरीय उपक्रमास कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ :- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने आज बिरसा मुंडा महाविद्यालय, गडचिरोली येथे भव्य जिल्हास्तरीय सदस्यता कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला जिल्हाभरातून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोली विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे सर यांनी उपस्थित राहून सदस्यता अभियानाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे कार्यक्षेत्र, कार्यपद्धती व संघटनात्मक दृष्टीकोनावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
या वेळी विदर्भ प्रदेश सहमंत्री अभिलाष कुनघाडकर, विभाग संयोजक रोहित श्रीरामवार, जिल्हा संयोजक विकास बोदलकर, जिल्हा प्रमुख चित्ते सर आणि सदस्यता प्रमुख संकेत मस्के यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
धानोरा, आरमोरी, गडचिरोली, वडसा आदी भागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेल्या या कार्यशाळेमध्ये सदस्यता अभियानाची योजना, नियोजन, अंमलबजावणी आणि विविध टप्प्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी सदस्यता अभियान अधिक गतिमान आणि प्रभावी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @ABVP #ABVP )










