फडणवीस फक्त लॉलीपॉप देतात, प्रश्न सोडवत नाहीत! – काँग्रेसचा वाढदिवसाच्या दिवशी जोरदार हल्ला

208

फडणवीस फक्त लॉलीपॉप देतात, प्रश्न सोडवत नाहीत! – काँग्रेसचा वाढदिवसाच्या दिवशी जोरदार हल्ला

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २२ जुलै :- गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असताना काँग्रेसने थेट त्यांच्या कार्यशैलीवर जोरदार हल्ला चढवत “लॉलीपॉप-चॉकलेट वाटप आंदोलन” केलं. “मुख्यमंत्री फक्त गडचिरोलीच्या जनतेला आश्वासनांची लॉलीपॉप वाटतात, पण वास्तवात प्रश्न तसंच आहेत” असा घणाघात काँग्रेसने केला.
मुख्यमंत्र्यांनी आजवर कधीही गडचिरोलीतील युवक, शेतकरी, महिला किंवा आदिवासी समाजाशी संवाद साधला नाही, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. केवळ प्रकल्प, गुंतवणूक आणि विकासाच्या गाजराने गडचिरोलीकरांना दिशाभूल करण्यात आली, असा काँग्रेसचा आरोप आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसने केक कापून नागरिकांना चॉकलेट आणि लॉलीपॉप वाटले आणि ‘हेच सरकारने दिले आहे’ असा प्रतीकात्मक संदेश दिला.
या तीव्र आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, आमदार रामदास मसराम, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अॅड. कविता मोहरकर, सतीश विधाते यांच्यासह सर्व तालुक्यांतील अध्यक्ष, सेल प्रमुख आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने स्पष्ट शब्दांत सांगितले
“मुख्यमंत्र्यांचा गडचिरोली दौरा म्हणजे निव्वळ इव्हेंट, जनतेच्या दुःखाशी काही देणं-घेणं नाही!”