गडचिरोलीत अपघातग्रस्तांना दिलासा : लॉईड्स मेटल्सने तत्काळ उपलब्ध करून दिले हेलिकॉप्टर

214

गडचिरोलीत अपघातग्रस्तांना दिलासा : लॉईड्स मेटल्सने तत्काळ उपलब्ध करून दिले हेलिकॉप्टर

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ७ ऑगस्ट :- आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारी ठरली असून, जखमींवर गडचिरोली सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपूरला हलविण्याची आवश्यकता निर्माण झाली.
या पार्श्वभूमीवर, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने पुन्हा एकदा सामाजिक भान राखत माणुसकीचे दर्शन घडवले. कंपनीने तातडीने आपले खासगी हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले असून, त्याद्वारे जखमी युवकांना नागपूरला हलवण्यात आले आहे.
यापूर्वीदेखील लॉईड्स मेटल्सने अशाच प्रकारची मदत केली होती. २ ऑगस्ट रोजी हेडरी येथे ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलिस नाईक राहुल गायकवाड यांना स्वतः कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला उपचारासाठी पोहचवले होते.
हा सामाजिक भानाचा पुढाकार जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. लॉईड्स मेटल्सकडून वेळोवेळी मिळणारी ही मदत जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीत मोठा आधार ठरत आहे.