Home चंद्रपूर तेली समाज एकता महासंमेलानाचा लोढोंलीत गजर

तेली समाज एकता महासंमेलानाचा लोढोंलीत गजर

473

लोकवृत्त न्युज
ता/प्र.तुलसीदास भुरसे सावली :- तालुक्यातील लोंढोली येथे २९ डिसेंबर रोजी संताजी सोशल फाउंडेशन सावली द्वारा आयोजित तेली समाज एकता महासंमेलन व भव्य दिव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार देवराव भांडेकर, उद्घाटक महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, सत्कारमूर्ती जितु वैरागडे सहायक पोलीस निरीक्षक नागपूर, विशेष अतिथी प्रकाश देवतळे प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, हरिश्चंद्र दहागाणे नागपूर जिल्हा संघटक, बाबुराव कोहळे, प्रभाकर वासेकर, रमेश बारसाकडे, संजय कुणघाडकर इत्यादी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
याप्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तालुका अध्यक्षा वैशालिताई कुकडे यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष कुनघाडकर यांनी मानले. सूत्रसंचालन संचालक रुपेश किरमे यांनी केले.

Don`t copy text!