गडचिरोली ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्षपदी उदय धकाते यांची निवड
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- ग्राहक हक्कांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांची अखिल भारतीय ग्राहक पंचायत, गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन ही जबाबदारी देण्यात आली.
गडचिरोली येथे प्रांताध्यक्ष डॉ. नारायण मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रांत संघटन मंत्री अभय खेडकर, प्रांत सचिव चारुदत्त चौधरी, साकोषाध्यक्ष संतोष डोमाळे, प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक प्रकाश पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा सचिवपद सांभाळताना उदय धकाते यांनी जिल्हा व राज्यस्तरावर ग्राहकांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली. त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे गडचिरोली ग्राहक पंचायतची ठळक ओळख निर्माण झाली.
यावेळी प्रांताध्यक्ष डॉ. मेहरे यांनी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून उदय धकाते, उपाध्यक्ष विजय साळवे व डॉ. महेश जोशी, सचिव अरुण पोगळे, सहसचिव सौ. विद्या श्रीराम जवळे व नरेश कहूरके, कोषाध्यक्ष अनंता माकोडे, महिला आयाम प्रमुख सौ. सुचिता उदय धकाते, मार्गदर्शक प्रकाश पाठक, केंद्र कार्यालय प्रमुख विजय कोतपल्लीवार, प्रचार प्रमुख सौ. जोत्स्ना कापूरकर, विधी आयाम प्रमुख ॲड. नीलकंठ भांडेकर, पर्यावरण प्रमुख डॉ. देवेंद्र मुनघाटे, रोजगार सृजन प्रमुख सौ. भारती स्वरूप तारगे, IT सेल प्रमुख अमित साखरकर यांची निवड झाली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. किशोर वैद्य, सौ. सुनीता विजय साळवे, सौ. शालिनी निंबारते, सौ. आशा आनंदराव कोकोडे, सौ. नीलिमा देशमुख, सौ. मेघा विजय कोतपल्लीवार, मनसुखलाल मेश्राम, बळवंतराव येवले, राजू सत्यनारायणराव गुब्बावार, साक्षी प्रकाश भांडेकर व अमित हस्ते यांचा समावेश आहे.
“गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही ग्राहकाची व्यापारी किंवा अन्य विभागातून फसवणूक झाल्यास त्यांनी निर्धास्तपणे ग्राहक पंचायतकडे तक्रार करावी. ग्राहक हक्कांसाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध आहोत,” असे उदय धकाते यांनी सांगितले.










