गडचिरोलीत २०२५ साठी स्थानिक सुट्ट्या जाहीर

641

पोळा, घटस्थापना आणि दिवाळीला विश्रांतीचा आनंद

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,  :- गडचिरोलीकरांसाठी आनंदाची बातमी. जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा यांनी सन २०२५ मधील स्थानिक सुट्ट्यांची घोषणा केली असून, यामध्ये पारंपरिक सणांच्या जल्लोषात विश्रांती घेण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

घोषित सुट्ट्यांमध्ये

२२ ऑगस्ट (शुक्रवार) – पोळा (पहिला दिवस), बैलांच्या सजावटीसह गावागावात साजरा होणारा शेतकऱ्यांचा महोत्सव
२२ सप्टेंबर (सोमवार) – घटस्थापना, नवरात्राचा शुभारंभ
२० ऑक्टोबर (सोमवार) – नरक चतुर्दशी (दिवाळी), प्रकाश व आनंदाचा सण

या सुट्ट्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांना लागू राहतील. मात्र, दिवाणी व फौजदारी न्यायालये तसेच बँकांसाठी या सुट्ट्या लागू होणार नाहीत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सणांच्या पारंपरिक उत्साहात गडचिरोलीकर पुन्हा एकदा एकत्र येणार असून, या सुट्ट्यांमुळे सांस्कृतिक व कौटुंबिक भेटीगाठींना चालना मिळणार आहे.