छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या ; पतीला अटक, सात जणांविरोधात गुन्हा
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी :- आष्टी तालुक्यातील धक्कादायक घटनेत प्रियंका पराग कुंदोजवार (२८) या विवाहित तरुणीने पती व सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून १४ ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृतक प्रियांकाची आई सुवर्ण कत्रोजवार (रा. गडचिरोली) यांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पती पराग दिवाकर कुंदोजवार याच्यासह पल्लवी सुरेश वैरागडवार (रा. मानेवडा चौक, नागपूर), दिवाकर मुरलीधर कुंदोजवार, छाया दिवाकर कुंदोजवार, सुमित दिवाकर कुंदोजवार, सतीश चंद्रकांत कुंदोजवार, पूनम सतीश कुंदोजवार व व्यंकटेश मुरलीधर कुंदोजवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी पती परागला अटक करून शनिवारी चामोर्शी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसांकडून सुरू आहे.
@lokvrutt.com #lokvruttnews #gadachirolinews #today_news #gadachirolipolice #Maharashtra police #Maharashtra #आत्महत्या













