गडचिरोली-नारायणपूर सीमेवर भीषण चकमक ; ४ जहाल माओवादी ठार

947

गडचिरोली-नारायणपूर सीमेवर भीषण चकमक ; ४ जहाल माओवादी ठार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २७ : गडचिरोली–नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात २५ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण चकमकीत ४ जहाल माओवादी ठार झाले आहेत. यामध्ये १ पुरुष व ३ महिलांचा समावेश असून, घटनास्थळावरून ०१ SLR रायफल, ०२ INSAS रायफल व ०१ .३०३ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील C-60 च्या १९ पथकांबरोबर CRPF QAT च्या २ पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे कोपर्शी जंगल परिसरात शोधमोहीम हाती घेतली होती. मुसळधार पावसात सलग दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतर २७ ऑगस्ट रोजी सकाळी पोलीस पथके जंगल परिसरात दाखल झाली.
शोधमोहीम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी अचानक पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही प्रभावी प्रत्युत्तर दिल्याने चकमक तब्बल आठ तास सुरू राहिली. त्यानंतर परिसराची तपासणी केल्यावर ४ माओवादी ठार झाल्याचे स्पष्ट झाले.
सदर भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Gadchirolipolice @naxal_chakmak #Chandrapurnews #RoadSafety #Accident #PublicWorks #Administration #Maharashtra