गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची नियुक्ती

195

गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची नियुक्ती

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ०३ :- गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारताना आमदार नरोटे यांनी महाराष्ट्र शासनाचे तसेच आपल्या कार्यावर विश्वास दाखवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या नियुक्तीनंतर आमदार नरोटे म्हणाले की, “विद्यापीठाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन,” अशी ग्वाही देत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील सकारात्मक बदल घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला चालना मिळणार असून स्थानिकांसह विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

#गडचिरोली #गोंडवाना_विद्यापीठ #MilindNarote #Education #MarathiNews @lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Gadchirolipolice #Maharashtra