गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हीने पटकाविले सुवर्णपदक

170

– पुण्यातील राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात गुन्हेशोधक प्रकारात पहिले स्थान

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली / पुणे, दि.२३ : पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 20 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलाचा श्वान ‘सारा’ने गुन्हेशोधक प्रकारात सुवर्णपदक पटकावत राज्यात गडचिरोलीचा झेंडा उंचावला आहे.
15 ते 19 सप्टेंबरदरम्यान झालेल्या या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये 25 विभागांचा सहभाग होता. यामध्ये सायंटिफिक एड टु इन्वेस्टीगेशन, पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, कम्प्युटर अवेअरनेस, अँटी सॅबोटेज चेक तसेच श्वान पथक स्पर्धा घेण्यात आल्या. लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक अशा सर्व प्रकारच्या परीक्षेत कस लावण्यात आला.
या स्पर्धेत गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील श्वान साराने जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले असून आता ती नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा श्वान स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गडचिरोली श्वान पथकाचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार, श्वान हस्तक पोहवा/2134 राजेंद्र कौशिक व पोहवा/2314 अर्जुन परकीवार यांचे विशेष कौतुक केले. भविष्यातही अशाच दर्जेदार कामगिरीच्या शुभेच्छा देत त्यांनी संपूर्ण गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले.

#lokvrutt.com #lokvruttnews #gadchirolinews #GadchiroliPolice #SaraDogSquad #MaharashtraPoliceDutyMeet #GoldMedal