गडचिरोली नगराध्यक्षपदासाठी प्रणोती निंबोरकर सर्वाधिक चर्चेत

720

– नव्या नेतृत्वाच्या शोधात भाजप, “प्रणोतीच हवी शहराच्या विकासाची धुरा”

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच गडचिरोलीच्या राजकारणात एकच नाव गाजत आहे – प्रणोती सागर निंबोरकर. नुकत्याच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या या कार्यकर्त्या आता शहराच्या विकासासाठी आणि सुशासनासाठी नवे नेतृत्व म्हणून नागरिकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांत उमेदवार निवडीची लगबग सुरू आहे. मात्र, भाजपच्या गडचिरोली शाखेत “प्रणोतीच हवी नगराध्यक्ष” अशी मागणी जनतेकडून तीव्रतेने पुढे येत आहे.
अल्पावधीतच आपल्या प्रभावी नेतृत्वशैली, लोकसंपर्क कौशल्य आणि प्रखर सेवाभावाने प्रणोती निंबोरकर यांनी पक्षातील कार्यकर्त्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विश्वास जिंकला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपच्या शहर संघटनेला नवी ऊर्जा व दिशा मिळाली आहे, असे मत स्थानिक नेत्यांनी व्यक्त केले.
महिला सबलीकरण, युवकांसाठी रोजगार उपक्रम, आणि शहरातील विकासकामांतील पारदर्शकता या तीनही आघाड्यांवर प्रणोती निंबोरकर यांनी कार्याचा ठसा उमटवला आहे. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा त्यांचा कार्यमंत्र असल्याचे त्यांच्या उपक्रमांतून स्पष्ट जाणवते.
शहरातील सामाजिक संस्था, व्यापारी वर्ग, महिला मंडळे, युवक व युवती यांच्यात एकमताने मागणी होत आहे की,
“गडचिरोली नगर परिषदेचा विकासाचा नवा अध्याय सुरू करायचा असेल, तर नगराध्यक्षपद प्रणोती निंबोरकर यांनाच द्यावे”
भाजपाच्या ध्येयधोरणाशी प्रामाणिक राहून कार्य करणाऱ्या प्रणोती निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहरात सशक्त नेतृत्व, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक विकास या त्रिसूत्रीचा नवा युगारंभ होईल, असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
@Lokvrutt.com #lokvruttnews #Gadachirolinews
#GadchiroliElection2025 #PranotiNimborkar #BJP #Leadership #Development #WomenInPolitics