पोलीस सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी ; API कल्पेश खारोडे व पूजा कल्पेश खारोडे यांचे रक्तदानातून आदर्श योगदान

250

पोलीस सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी ; API कल्पेश खारोडे व पूजा कल्पेश खारोडे यांचे रक्तदानातून आदर्श योगदान

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमाअंतर्गत ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात विशेष अभियान पथकातील API कल्पेश बाबाराव खारोडे व पूजा कल्पेश खारोडे यांनी रक्तदान करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला.
गडचिरोली जिल्ह्यात सन २०१७ पासून सेवेत असलेले API कल्पेश बाबाराव खारोडे हे पोलीस सेवेबरोबरच सामाजिक उपक्रमांत नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. आतापर्यंत त्यांनी १० ते ११ वेळा रक्तदान करून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यात मोलाचे योगदान दिले आहे. याच सामाजिक जाणिवेतून पूजा कल्पेश खारोडे यांनीही रक्तदान करत या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
हे रक्तदान शिबिर पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचा व पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पोलीस अधिकारी-अंमलदार, नागरिकांसह आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण १२०३ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.
API कल्पेश बाबाराव खारोडे व पूजा कल्पेश खारोडे यांच्या या कृतीमुळे पोलीस दलाचा सामाजिक चेहरा अधोरेखित झाला असून, पोलीस म्हणजे केवळ कायदा रक्षक नव्हे तर समाजाचे खरे सेवक असल्याची भावना अधिक बळकट झाली आहे.