Home Breaking News CISF निवड झालेल्या सानियाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

CISF निवड झालेल्या सानियाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

668

वर्दी घालण्याआधीच नियतीचा घाला 

लोकवृत्त न्यूज
गोंडपिपरी, :- देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शिर्शी (बेरडी) येथील सानिया रामकृष्ण कोसरे (वय २०) हिचा शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी शिर्शी बसस्थानकाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
सानियाची २० डिसेंबर रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) निवड झाली होती. निवडीनंतर ती रोजप्रमाणे शारीरिक तंदुरुस्तीच्या सरावासाठी घराबाहेर पडली असता हा भीषण अपघात घडला. धडक इतकी तीव्र होती की तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून, अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत.
सानियाच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समाजाने देशसेवेची उमेद असलेली एक होतकरू कन्या गमावली आहे.

Don`t copy text!