Home गडचिरोली धानोऱ्यात उद्या ‘भव्य हिंदू संमेलन’ व ‘कलश यात्रे’चा उत्साह; सकल हिंदू समाजाचे...

धानोऱ्यात उद्या ‘भव्य हिंदू संमेलन’ व ‘कलश यात्रे’चा उत्साह; सकल हिंदू समाजाचे आयोजन

294

धानोऱ्यात उद्या ‘भव्य हिंदू संमेलन’ व ‘कलश यात्रे’चा उत्साह; सकल हिंदू समाजाचे आयोजन

लोकवृत्त न्यूज
धानोरा (जि. गडचिरोली) : हिंदू समाजात जागृती निर्माण करण्यासाठी तसेच सनातन संस्कृतीचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने धानोरा येथे उद्या, शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘भव्य हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने शहरात भव्य कलश यात्रा काढण्यात येणार असून, संपूर्ण धानोरा नगरी भक्तीमय वातावरणाने भारून जाणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता दुर्गा चौक, माळी मोहल्ला येथून होणाऱ्या कलश यात्रेने होणार आहे. प्रसिद्ध भागवतकार आचार्य हरी ओमजी पाण्डेय महाराज (चित्रकूट) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करत दुर्गामाता मंदिर, बाजार वार्ड येथे समाप्त होणार आहे.
यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत दुर्गामाता मंदिर परिसरात मुख्य हिंदू संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात प्रशांतजी दानी (प्रांत शारीरिक प्रमुख) हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून हिंदू एकता, सामाजिक बांधिलकी व संस्कृती संवर्धनावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दौलतशहाजी मडावी, मुकाजी भेंडारे, वामनजी गावतुरे व राजेशजी जागी-गायपुजारी यांची उपस्थिती लाभणार आहे. सनातन धर्माची मूल्ये दृढ करण्यासाठी तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदू समाज, धानोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Don`t copy text!