Home Breaking News गुरवळा नदीकाठी युवकाची निर्घृण हत्या

गुरवळा नदीकाठी युवकाची निर्घृण हत्या

3880

गुरवळा नदीकाठी युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८:- जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या गुरवळा गावाजवळील नदी परिसरात एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २८ मे रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोसनकर (वय १८, रा. डोंगरगाव) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. गुरवळा नदी परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. मृतक युवकाच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव दिसून आल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तसेच तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
युवकाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिस विविध अंगांनी तपास करीत असून संशयितांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, दिवसाढवळ्या उघडकीस आलेल्या या हत्याकांडामुळे गुरवळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Don`t copy text!