वरोरा हादरले! शाब्दिक वादातून युवकाची हत्या

327

– पोलिसांनी काही तासांत आरोपी पकडला

लोकवृत्त न्यूज
वरोरा दि. ९ :- वरोरा शहरात झालेल्या धक्कादायक घटनेत शाब्दिक वादातून एका युवकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांच्या शिताफीमुळे आरोपीला काही तासांतच अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल नवघरे (वय ३५, रा. केसरी चंदन गणपतीजवळ, वरोरा) याचा हनुमान वॉर्डातील रहिवासी नितीन चुटे याच्याशी शाब्दिक वाद झाला होता. त्याच रागातून ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता साई मंगल कार्यालयाजवळ आरोपीने नितीनवर मागून धारदार शस्त्राने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या नितीनला उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी पसार झाला होता. परंतु वरोरा पोलिसांनी वणी रोडवर सापळा रचून काही तासांतच त्याला जेरबंद केले. ही कारवाई ठाणेदार अजिंक्य तांबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भस्मे, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे व प्रशांत नागोसे यांनी केली.

#चंद्रपूर #विदर्भ #मानववनसंघर्ष #मराठीबातमी #लोकवृत्त #अपघात #मडर
@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #gadchirolinews @Chandrapurnews @Chandrapurpolice #accident #Maharashtra