गडचिरोली : वाहतूक नियमभंगाविरुद्ध विशेष कारवाई, दोन महिन्यांत लाखोंचा दंड वसूल

302

गडचिरोली : वाहतूक नियमभंगाविरुद्ध विशेष कारवाई, दोन महिन्यांत लाखोंचा दंड वसूल

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली  :- नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलामार्फत जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान विविध प्रकारच्या नियमभंग प्रकरणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या कालावधीत दुचाकीवर तिन्ही व्यक्ती बसवून (ट्रिपल सीट) वाहन चालविणाऱ्या एकूण २३० वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून रु. २,२३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) ७९ प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. संबंधित वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रलंबित चालान वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानांतर्गत एकूण १,६०५ प्रलंबित चालान प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामधून रु. १०,२१,३००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत असून, भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.