अज्ञात वाहनाची भीषण धडक : तिघे जखमी

484

अज्ञात वाहनाची भीषण धडक : तिघे जखमी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : आरमोरी पोलिस ठाण्यांतर्गत चुरमुरा ते वसा मार्गावर शनिवारी (दि. ११) सायंकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातात तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कारमधील दोन प्रवासी आणि एक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये कारमधील उज्वला तेसणे, कारचालक पांडूरंग पेसणे तसेच दुचाकीस्वार प्रशांत भोयर (रा. अडपल्ली) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
जखमींना तत्काळ गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र, या अपघाताबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल न झाल्याने अपघाताचे नेमके कारण अस्पष्टच आहे.
दरम्यान, अज्ञात वाहनाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, पुढील तपास आरमोरी पोलिस करीत आहेत.