ताडगाव येथील एच.पी.गॅस एजन्सी चा काळाबाजार

492

– एटापल्लीचे तहसीलदार यांना परवाना रद्द करण्याची निवेदनातून मागणी


लोकवृत्त न्युज
एटापल्ली दि. 1 सप्टेंबर : तालुक्यातील ताडगाव येथील कमला एच.पी गॅस एजन्सी काळाबाजार करीत असून, पेट्रोलियम अँड सेफटी ओर्गनायझेशन मान्यता प्राप्त नियमानुसार नसल्याने तसेच गॅस विक्री विषय आदेशीत सुरक्षा मानकाचा अभाव असल्याने नागरिकांना होणारा धोका लक्षात घेता सदर गॅस एजन्सी चा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाकपा एटापल्ली ता. सचिव कॉ, सचिन मोसकरवार यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, एटापल्ली तालुक्यातील ताडगाव येथील कमला एचपी गॅस एजन्सी ला एटापल्लीत तसेच संपूर्ण एटापल्ली तालुक्यात पेट्रोलियम अँड सेफ्टी ओर्गनायझेशन मान्यता प्राप्त नियमानुसार बनवलेले गोडाउन नाही, गोडाउन नसताना गॅस विक्री करून नागरिकांचा जीव व मालमत्तेला यामुळे धोका आहे व गॅस एजन्सी देताना घातलेल्या अटी व नियमांचा भंग सुद्धा होत आहे, सर्व गॅस विक्री विषय आदेशीत सुरक्षा मानक तोडत गेंदा, जारावंडी, कृषणार, एटापल्ली या गावात नागरिक निवासी क्षेत्रात घरी गॅस ठेवून गॅसची विक्री केल्या जात आहे, पेट्रोलियम अँड सेफ्टी ओर्गनायझेशन च्या नियमानुसार नागरिक निवासी क्षेत्रात अशाप्रकारे गॅस विक्री करुन नागरिकांचे जीव धोक्यात घालणे हा दंडणीय अपराध असून गॅस एजन्सी देताना घातलेल्या अटी व नियमांचा भंग सुद्धा होतांना दिसत आहे . तसेच संपूर्ण एटापल्ली तालुक्यात घरगुती गॅस चा काळाबाजार होताना दिसून येत असून घरगुती गॅस हॉटेल व्यावसायिकांना विक्री करत असल्याचेही दिसून येत आहे आहे. संपूर्ण एटापल्ली तालुक्यातील हॉटेल ची तपासणी केल्यास घरगुती गॅस चा वापर होत असल्याचे दिसून येईल, ज्या ठिकाणी गॅस विक्री ची परवानगी आहे त्या ठिकाणी घरपोच गॅस पोहचवण्याची सुविधा देत नाहीत इत्यादी सर्व बाबींवर गंबिरतेने विचार करून एटापल्ली तालुक्यात कार्यरत कमला एच.पी गॅस एजन्सी ताडगाव चा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भाकपा एटापल्ली ता. सचिव कॉ, सचिन मोसकरवार यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.