एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी

0
366

लोकवृत्त न्यूज
कोरपना १९ एप्रिल:- एकाच रात्री एक दुकान व दोन घरून चोरट्यानी विविध वस्तू लंपास केल्याची घटना मध्यरात्री 12 ते 3 वाजताच्या दरम्यान घडली घटनेत मेन रोड वरील डायमंड ज्वेलर्स येतील शटरचे लॉक कटर च्या साह्याने तोडून ज्वेलर्स मधील वेगवेगळे चांदिचे जोडवे चाळ बीचवे आदी वस्तू अंदाजे किमत 46 हजार रुपये लंपास केले याची तक्रार ज्वेलर्स मालक अब्दुल मोहम्मद यांनी दाखल केली आहे दुसऱ्या घटनेत कोरपना येतील वामन मेसराम यांच्या घरच्या अंगनातून एम एच ३४ सी सी ५६४५ क्रमांकाची शाईन गाडी अंदाजे किमत ८० हजार चोरट्यांनी लंपास केली तिसऱ्या घटनेत कोरपना येतील पाण्याच्या टाकी जवळ वास्तव असलेले पोस्ट ऑफिस मध्ये कार्यकत कर्मचारी भुसारी यांच्या घरची एम आय ची प्लँट एइ डी टीव्ही अंदाजे किंमत १० हजार रुपये रोख सतरा हजार रुपयाची रकम लंपास केली या सर्व घटना एकाच दिवशी बारा ते तीन या तीन तासा दरम्यान तीन चोरीच्या घटना घडल्याने कोरपना त दहशतीचे वातावरण पसरले आहे घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय शुक्ला अमर राठोड व कोरपना पोलीस करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here