सुरजागड लोहखनिज प्रकल्प नागरिकांच्या जिव्हारी : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची एसटी बस ला जबरदस्त धडक

686

आलापल्ली पोष्ट ऑफिस समोर एटापल्ली जाणाऱ्या बस ला सुरजागड प्रकल्पाच्या ट्रक ने दिली धडक जिवीत हाणी टळली  

लोकवृत्त न्यूज
आलापल्ली दि. 6 सप्टेंबर :- आज सकाळी 8 वाजता सुमारात बस क्रमांक MH 40 AQ 6094 हि बस अहेरी वरुन एट्टापल्ली कसनसुर गडचिरोली ला जात असताच बसा चा अपघात आलापल्ली ते एटापल्ली रोड वर बस व पालवो ट्रक क्रमांक OD 09 G 0855 ची धडक जिवित हाणी टळली सुरजागड वरुन लोहखनिज घेऊन जाणारी पावलो ट्रक नि दिली धडक बस मध्ये सकाळी शाळेत जाणारे मुले होती.

बस डावर च्या पायाला दुखापत 

ट्रक साहिडला ठेउन तो डावर आणि माफि मागतना

सुजागड लोह प्रकल्प यांच्या गाड्या ट्रक चा भीषण अपघात वारंवार होत असल्याने दखल घेण्यात यावी कारण आज जीवित हानी झाली नसेल तरी पण हा अपघात झाला आहे बस चा समोरील भाग ने कमी झाला आहे याच्यामध्ये प्रवासी होते

सुरजागड लोहखनिज प्रकल्पात अनेक मोठमोठया ट्रकव्दारे लोहखनिजाची वाहतुक केली जाते. या लोहखनिज प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध असतांनाही लोहखनिज प्रकल्प सुरु करण्यात आले. यापुर्वीही लोहखनिज वाहतुक करणाऱ्या ट्रकमुळे मोठे अपघात झाले आहेत तसेच काहींना आपला जिवही गमवावा लागला आहे. नेहमीच या मार्गावर ट्रक ची वर्दळ असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसत आहे. मागील काही दिवसाअगोदर याच ट्रकच्या कोंडीमुळे रुग्णवाहीकेस अडथळा निर्माण झाला होता व साईड मिळणे कठिण झाले होत याबाबत सोशल मिडीयावर विडीओ वायरल झाले आहे. तसेच जड वाहतुकीमुळे आष्टी-आलापल्ली मार्गाची अक्षरः चाळण झाली असून रेपनपल्ली जवळील रस्त्यावरील खड्डे चक्क लोहखनिजाने बुजविले होते. लोहखनिज वाहतुक करणारे वाहन भरधाव वेगाने जात असल्याने प्रवाशांना जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. भविष्यात मोठा अपघात होण्याचेही शक्यता नाकारता येत नाही.