गडचिरोलीतील मुख्य चौकात सुरू असलेल्या रस्ता कामात सुरक्षेचा अभाव : वाहतुकीस अडथळा

0
391

– आरमोरी मार्गावरील दोन्ही बाजूने खोदकाम केल्याने धवन वाहतुकीची कोंडी

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, ६ सप्टेंबर : शहरातील एकमेव मुख्य चौक असलेल्या इंदिरा गांधी चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. आरमोरी मार्गावरील दोन्ही बाजूने खोदकाम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण होत असून या कामात सुरक्षेचा अभाव दिसून येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसापासून सुरू आहे. काही काम बाकी होते. दोन दिवसापासून उर्वरित काम सुरू असून मुख्य चौकातून आरमोरी मार्गावरील दोन्ही बाजूने रस्ता खोदकाम करून काम करण्यात येत आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण निर्माण होत असून लांबच लांब रांगा दिसून येतात. मुख्य चौक असल्याने दिवसभर वर्दळ असते. हे माहीत असतांनाही सदर रस्ता बांधकाम करण्यात येत आहे. रस्ता बांधकाम करतांना रस्ता बांधकामातील कोणताही कर्मचारी वाहतूक नियंत्रणाकरिता दिसून येत नसून सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास याला जिम्मेदार कोण असा सवालही उपस्थित होत आहे. वाहतूक चौकी समोर रस्ता बांधकामातील अवजड वाहन उभे करण्यात आले ही वाहने कोणाच्या मर्जीने ठेवण्यात आली ? वाहतूक पोलीसांनी या वाहनांना मुख्य चौकात उभे ठेवण्यास संमती दिली काय ? कोणाच्या आशीर्वादाने हे काम चालले आहे ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याकडे संबंधीत विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here