दोन वर्षिय चिमुकलीवर अत्याचारी कोतवाला ला अटक

461

तीन महिन्यापासून पोलिसांना देत होता हुलकावणी

लोकवृत्त न्यूज
एटापल्ली ५ नोव्हेंबर: तालुक्यातील बुर्गी पोलीस मदत केंद्र हद्दीतील करपनफुंडी येथील २ वर्षे वयाच्या बालिकेवर अत्याचार करणारा त्याच गावचा आरोपी कोतवाल सुंदरसाई घिस्सो मडावी या नराधमास घटनेच्या तीन महिन्यानंतर बुर्गी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुंदरसाई मडावीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अत्याचारी नराधम कोतवाल सुंदरसाय मडावीने तीन महिन्यापूर्वी २३ जुलैला २ वर्षे वयाच्या
नात्यातीलच बालिकेवर अत्याचार केला होता. ही बाब अत्याचार ग्रस्त बालीकेच्या आई, वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बुर्गी पोलिसात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुंदरसाय विरुद्ध पोस्को व अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे, घटनेच्या तीन महिन्यापासून आरोपी सुंदरसाई मडावी नक्षल प्रभावी जंगल परिसरात फरार राहून पोलिसांना हुलकावणी देत होता. त्यामुळे अटकेची कारवाही करण्यास पोलिसांना अडचण निर्माण झाली होती,फरार अत्याचारी नराधम सुंदरसाई मडावी येलचिल, बुर्गी, ताडगाव व करपनफुंडी अशा नक्षल प्रभावी जंगल परिसरात फिरत असल्याच्या

गुप्त माहितीवरून पोलीस अधीक्षक निलोत्पल बासू, अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दडस यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे, संदीप व्हसकोटी यांच्या पथकाने ३ नोव्हेंबर गुरुवारी अत्याचारी नराधम सुंदरसाई मडावी याला करपनफुंडी गावातून अटक केली. अटकेनंतर त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुंदरसाईला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

निरागस २ वर्षे वयाच्या बालीकेला न्याय मिळण्यासाठी अत्याचारी नराधम सुंदरसाईला फासावर लटकविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.